Student Rights Community Portal

Notices (अधिकृत सूचना व परिपत्रके)

समितीचे अधिकृत परिपत्रक, शासन निर्णय (GR), वसतिगृह सूचना आणि विद्यार्थ्यांसाठी तातडीच्या घोषणा.

सर्व प्रसिद्ध परिपत्रके (Circulars & Announcements)

Notice Banner Attachment
NORMAL 11 Aug 2026

शासकीय वसतीगृह योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठीचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

शासकीय वसतीगृह योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठीचे प्रवेशाचे वेळापत्रक - १२ वी नंतरच्या या नविन उच्च शिक्षण घेण्या-प्रवेशितांकरिता व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठीप्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी - दिनांक ते ०७.८.२०२६ ३१.८.२०२६

Valid Till: 31 Aug
Notice Banner Attachment
NORMAL 11 Aug 2026

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे शासकीय वसतिगृह व्यावसायीक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Valid Till: 15 Aug
Notice Banner Attachment
NORMAL 11 Aug 2026

स्वाधार योजना नूतनीकरण अर्ज सुरू

कोण अर्ज करू शकतात? 1. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये New + Approved असलेले विद्यार्थी, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी Existing Applicant म्हणून स्वाधारचा अर्ज भरू शकतात. 2. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये Renew + Approved असलेले विद्यार्थी देखील Existing Applicant म्हणून स्वाधार योजनेसाठी अर्ज करू शकतात. 3. ज्या जिल्हा/तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना New Applicant म्हणून थेट स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल. 4. ज्या जिल्हा/तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, तसेच ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वीपासून स्वाधार योजनेचा लाभ मिळत आहे, अशा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी Existing Applicant म्हणून अर्ज करावा. Existing Applicant म्हणून अर्ज करण्याची अंतिम मुदतः 15 सप्टेंबर 2026

Valid Till: 15 Sep
Notice Banner Attachment
EMERGENCY 11 Aug 2026

विद्यार्थी योजनांसाठी राज्यस्तरीय बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात

📍वारंवार विनंत्या करूनही समाज कल्याण विभाग झोपले आहे! समाजकल्याण विभागाला जागे करूया, आंदोलनाने हक्क मिळवूया! ​🔥 राज्यस्तरीय 21 मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन 📅 दिनांक: ११ ऑगस्ट २०२६ 📍 ठिकाण: समाज कल्याण आयुक्तालय, पुणे स्टेशन ​न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही!

Valid Till: 30 Nov