विद्यादान सहायक मंडळ शिष्यवृत्ती
नियम –
- विद्यार्थी गरजू असला पाहिजे, म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. (शहरी किंवा ग्रामीण असा भेद इथे केला जात नाही)
- शिष्यवृत्ती ही अभ्यासक्रमानुसार वेगवेगळी असते, विद्यार्थ्यांने ज्या अभ्यासक्रमाची निवड केली त्यानुसार त्याला ती शिष्यवृत्ती दिली जाते. (उदा. कला शाखेची फी वेगळी आहे, तर इंजिनीअरिंगची फी वेगळी असते.)
- शिष्यवृत्तीची रक्कम ही त्या-त्या संबंधित कॉलेजमध्ये कॉलेजच्या नियमावलीनुसार टप्प्याटप्याने किंवा एकत्रित भरली जाते. शिष्यवृत्ती कोणत्याही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जात नाही.
शिष्यवृत्तीसाठी निवडीचे निकष –
- विद्यादान सहायक मंडळाच्या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यावर घडते.
- टप्पा क्र. १. यामध्ये विविध सामाजिक संस्था, व्यक्ती, सोशल मीडिया, सामाजिक कार्यकर्ते, अशा विविध स्तरातून जेव्हा विद्यादान सहायक मंडळाकडे विद्यार्थी शेक्षणिक मदतीसाठी जोडले जातात तेव्हा त्यांची एक प्रारंभिक मुलाखत होते, ज्यात सर्वसाधारपणे तो विद्यार्थी, त्याचे कुटुंब, आर्थिक परिस्थिती यासर्वाबद्दल माहिती घेतली जाते.
- टप्पा क्र. २. विद्यार्थ्याला कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यानुसार त्यांची एक निवड परीक्षा घेतली जाते. उदा. अभियोग्यता चाचणी (aptitude test).
- टप्पा क्र. ३: मुख्य मुलाखत अशा तीन टप्प्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला जावे लागते. या तीनही टप्प्यांवर पडताळणी झाल्यावर मग विद्यार्थ्यांला त्यांच्या अभ्यासक्रमासाठी लागणारे अर्थ सहाय्य केले जाते.
विद्यादान सहायक मंडळ’ अर्थात (VSM) या संस्थेबद्दल आणि त्यांच्या या शिष्यवृत्तीबद्दल तुम्हाला www. vsimthane, org या संकेतस्थळावरून अधिक सविस्तर माहिती मिळू शकते.
