महाराष्ट्र शासनामार्फत इतर मागास बहुजन ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना राहण्याचा व जेवणाचा वार्षिक खर्च 60 हजार रुपये लाभ दिला जातो. पुणे जिल्हा इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय मार्फत 2024-25 शैक्षणिक वर्षाची पात्र विद्यार्थ्यांची यादी येत्या 15 दिवसात लागण्याची सूत्रांची माहिती आहे
विद्यार्थ्यांना याबाबत काही मदत हवी असल्यास जवळच्या जिल्हा संचालक जिल्हा इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय येथे संपर्क करावा. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा आपण संपर्क करून मदत घेऊ शकता.
