बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या युवक आणि युवतींकरीता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. महाराष्ट्र शासनाच्या सर्वकप पोरणानुसार बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी बार्टी मार्फत सामायिक प्रवेश परीक्षा (CET) करीता ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत.
सामयिक प्रवेश परीक्षेतील समाविष्ट योजना (अनिवासी) –
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (महाराष्ट्र)
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (दिल्ली)
एमपीएससी राज्यसेवा (राजपत्रित) परीक्षा पूर्व प्रशिक्षण
एमपीएससी गट ‘ब’ व ‘क’ (अराजपत्रित) परीक्षा पूर्व प्रशिक्षण
एमपीएससी न्यायिक सेवा (JMFC) परीक्षा पूर्व प्रशिक्षण
एमपीएससी अभियांत्रिकी सेवा (MES) परीक्षा पूर्व प्रशिक्षण
बैंक (आयबीपीएस), रेल्वे, एलआयसी, नाबार्ड इ. परीक्षा पूर्व प्रशिक्षण
कर्मचारी निवड आयोग (SSC) वर्ग-३ परीक्षा पूर्व प्रशिक्षण
पोलीस /मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण
उक्त संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत.
कोणत्याही योजनेच्या लाभासाठी उमेदवारांकडे आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हता तसेच इतर संबधित कागदपत्रांची यादी:
१. जात/जमातीचे मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
२. जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
३. दहावी गुण पत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
४. बारावी गुण पत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
५. पदवी गुण पत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
६. रहिवासी दाखला मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
७. आधारकार्ड मूळ छायांकित स्कॅन प्रत
८. आधारकार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील पास बुक स्कॅन प्रत
९. तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्त्पन्नाचा दाखला स्कॅन प्रत
१०. दिव्यांग असल्यास, सिविल सर्जन यांनी निर्गमित केलेला दिव्यांगत्वाचा दाखला स्कॅन
११. अनाथ असल्यास, उपायुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला स्कॅन प्रत.
१२. नॉन क्रीमिलेयर दाखला मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत (सारथी व महाज्योती करिता)
अर्ज करण्याची मुदत –
दिनांक – १-८-२०२५ ते २०-०८-२०२५
अर्ज प्रिंट करण्याची मुदत –
२५-०८-२०२५
सदर योजनेकरीता ऑनलाईन अर्ज भरणेसाठी http://barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवरुनच ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत अथवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करावा. प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची ऑनलाईन सामयिक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल.
पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर क्लिक करून अर्ज भरावा –
🔰विद्यार्थ्यांनी आपला प्रवर्ग निवडून त्या पुढील लिंक ला क्लिक करून या प्रशिक्षण योजनांसाठी अर्ज करू शकता –
📍अनुसूचित जातीतील (मातंग व इतर तत्यान मांग, मातंग निनिमादिव, दखनी-गांग, मांग-म्हशी, गदारी, गारुडी, राधेगांग, मांग-गारोधी मांग-गारुडी, मादगी व मादिगा या जाती बंगळून) सर्व जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठीची लिंक –
https://barticet.in
📍सर्व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी लिंक –
https://barticet.in/TRTI
📍मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी लिंक –
https://barticet.in/SARTHI
📍इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (VJNT), विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील सर्व जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी लिंक –
https://barticet.in/MAHAJYOTI
४६) मातंग व इतर तत्लाम मांग, मातंग मिनिमादिग, दखनी-मांग, गांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, (४७) मांग-गारोडी, मांग-गारुडी, (३५) मादगी व (३६) मादिगा इत्यादि प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी लिंक –
https://barticet.in/ARTI
📍फॉर्म भरून हवा असेल तर @rj_finisher ह्या Instagram id वर मेसेज करा, संपर्कासाठी तुमचा मोबाईल नंबर पाठवा, फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल👍

