स्वरूप – महाराष्ट्र शासनाच्या इतर बहुजन मागास कल्याण विभागामार्फत OBC, VJNT, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि NTC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी पदवी पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६०,०००/- रुपये निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत केली जाते. पण आर्थिक मदत विभागानुसार बदलते. उदा.मुंबई ,पुणे नागपूर अश्या विविध ठिकाणी रक्कम हि कमी जास्त होते. ह्या योजनेची अर्ज प्रक्रिया ही 2024-25 मध्ये ऑफलाइन स्वरूपात चालू होती आणि सध्या 2025-26 करिता ऑनलाईन स्वरूपात www.hmas.mahait.in या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
आधार आणि स्वयंम योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. गुणवत्ता यादी प्रकाशित करून योजनेअंतर्गत लाभाचे वितरण विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर केले जाते.
यासंदर्भात परिपत्रक इतर बहुजन मागास कल्याण विभागाने जारी केले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट देण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची आवाहन विभागाने केले आहे.
आणि अर्ज करण्यासाठी असणारी शेवटची तारीख 17 ऑगस्ट यामध्ये मुदतवाढ व्हावी अशी मागणी विद्यार्थी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीने शासनाकडे केली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज करताना कुठलीच तांत्रिक चूक करू नये किंवा कारण अर्ज प्रक्रियेत काही चुका झाल्या तर त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी फार वेळ लागू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरून हवा असल्यास इंस्टाग्राम वरील rj_finisher या इन्स्टाग्राम id वर अर्ज भरून हवा आहे. असा मेसेज करावा असे आव्हान विद्यार्थी हक्क समितीने केले आहे.
आधार आणि स्वयंम योजनेकरीता आवश्यक पात्रता –
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदार हा मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील आधार योजनेसाठी पात्र असेल आणि स्वयंम योजनेसाठी धनगर समाजातील विद्यार्थी पात्र असेल.
- विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असावे.
- जात प्रमाणपत्र(Cast Certificate) आधार कार्ड बँक खातेशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- १२वी मध्ये किमान ६०% गुणासह उत्तीर्ण असावा, ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेतोय,त्या शहरातला विद्यार्थी रहिवासी नसावा.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५० लाख रुपयापेक्षा अधिक नसावे.
- अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा.
आधार किंवा स्वयम योजना अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे –
१. आधार कार्ड
२. जात वैधता प्रमाणपत्र
३. जात प्रमाणपत्र
४. उत्पनाचा दाखला
५. १२ वी मार्कशीट
६. बँकेचे पास बुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
७. दिव्यांग प्रमाणपत्र(विद्यार्थी दिव्यांग असेल तर)
८. सी जी पी ए टू पर्सेंटेज प्रमाणपत्र
९. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा(डोमासाईल)
१०. प्रवेशित महाविद्यालय आणि कॉलेज याचे बोनाफाईड
११. विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसल्याचे, कोणत्याही शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश नसल्याचे, कोणताही व्यवसाय करत नसल्याचे आणि आई-वडिलां सोबत वास्तव्यास नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र
अधिक माहितीसाठी संपर्क –
जिल्हा संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य. विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य.

