वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

VSPM Reg.No.: MH/59/96 (PARBHANI), F-2666 (PARBHANI) Est. 1996, द्वारा संचलित

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

सामयिक प्रवेश परीक्षा (CET) ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प, योजना तसेच विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. सन २०२५-२६ करीता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठीची जाहिरात दि. २९/०७/२०२५ व दि.३०/०७/२०२५ रोजी बार्टी संकेतस्थळावर तसेच विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी बार्टी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज दि.२०/०८/२०२५ पर्यंत सादर करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सदर घोषणापत्रकाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. २८/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच दि.२९/०८/२०२५ व दि.३०/०८/२०२५ या दोन दिवसांच्या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जातील ठराविक बाबी दुरुस्त करण्यासाठी व अर्जाची प्रिंट काढण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *