सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या स्वाधार योजनेच्या बाबतीतील शासन निर्णयानुसार स्वाधार योजनेच्या एकूण लाभाच्या रकमेतून भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती मध्ये मिळणारा निर्वाहभत्ता साधारण पाच ते 13 हजार रुपये असतो. तो विद्यार्थ्यांच्या स्वाधारच्या 60000 रकमेतून बी स्टेटमेंट मागवून त्याद्वारे निर्वाह भत्ता ची रक्कम वजा करून उर्वरित विद्यार्थ्याला दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात येते.
परंतु आता इथून पुढे असे होणार नाही दिनांक 15 ऑक्टोबर 2025 स्वाधार योजना शासन निर्णयातील शुद्धिपत्रकानुसार आता अशा प्रकारची कपात होणार नाही स्वाधार योजनेची संपूर्ण रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ती दोन टप्प्यात मिळणार आहे.
याविषयी सातत्याने सामाजिक न्याय विभागाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीने सातत्याने ही मागणी लावून धरली होती.

या विद्यार्थी मागणीची गंभीरपणे तात्काळ दखल घेत महाराष्ट्र शासनाने शुद्धिपत्रक जारी केले. याबद्दल सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्य सह आयुक्त (शिक्षण) मा. प्रमोद जाधव सरांचे समितीमार्फत सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट साठी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती यांच्या instagram पेजला youtube च्या पेजला आपण फॉलो सबस्क्राईब करा तसेच वेबसाईट student scheme.in याला सातत्याने भेट द्या. असे आव्हान समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजरत्न बलखंडे यांनी केले आहे.
याबाबतचे शासनाचे शुद्धिपत्रक –

