इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे OBC, VJNT SBC, NTC प्रवर्गातून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या महाविद्यालयामध्ये 1st year करिता तुम्ही ॲडमिशन घेतलय तर तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि NTC म्हणजेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना माध्यमातून राहण्याचा आणि जेवणाचा खर्च 38 ते 60 हजार रुपये दरवर्षी मिळत राहील.
याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक 29 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख होती. परंतु आपल्या विद्यार्थी हक्क समितीच्या पाठपुरावाने ही तारीख आता विद्यार्थ्यांसाठी 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक स्किनवर दिली आहे. ह्या hmas.mahait.org या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता.
त्यामुळे आता बीए बीकॉम बीएससी एमएससी एम कॉम मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी अशा विविध व्यवसाय बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसाठी आम्हाला मेसेज करा. तुम्हाला यादी मेसेज बॉक्समध्ये पाठवली जाईल.
या संदर्भात अर्ज करताना कुठलीही अडचण असल्यास आपण विभागाने जारी केलेले हेल्पलाइन क्रमांक 022 61316411 यावर सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संपर्क करू शकता किंवा विद्यार्थी हक्क समितीच्या या instagram पेजला डायरेक्ट मेसेज करू शकता. त्यानंतर तुम्हाला मदत केल्या जाईल.

