वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

VSPM Reg.No.: MH/59/96 (PARBHANI), F-2666 (PARBHANI) Est. 1996, द्वारा संचलित

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

स्वाधार योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या कागदपत्र कोणती लागतात? काय आहेत नियम – अटी  अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी?

1) स्वाधार योजना आहे तरी काय ?

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाकरिता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांची सुविधा देण्यात येते. परंतु प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची मर्यादा लक्षात घेता शासकीय वसतिगृहात सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी राहण्याचा व जेवणाचा खर्च 60 हजार देण्यात येतो. अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज आता सुरू झाले आहेत.

2) अर्ज केल्यावर किती पैसे मिळतात ?

विद्यार्थी जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेत असल्यास राहण्याचा 32 हजार आणि जेवणाचा 20 हजार तसेच निर्वाह भत्ता 8000 असे महानगरानुसार वेगवेगळ्या स्वरूपात एकूण खर्च 60 हजार मिळतो. आणि विद्यार्थी तालुक्यातील महाविद्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेत असल्यास 38 हजार मिळतो. यासोबतच विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग शाखेतला असेल तर त्याला प्रतिवर्षी अतिरिक्त पाच हजार रुपये म्हणजे एकूण 65 हजार रुपये आणि विद्यार्थी बीएससी म्हणजेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा असेल घरात दोन हजार रुपये शैक्षणिक साहित्य साठी असे एकूण 62 हजार रुपये दिले जातात.
परंतु एसीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश शुल्क साठी दिली जाणारी महाडीबीटी पोस्टमार्ट्रिक शिष्यवृत्ती मध्ये मिळणारा निर्वाह भत्ता या स्वाधार योजनेच्या एकूण रकमेतून वजा करून विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांमध्ये लाभ दिला जातो.

3) अर्ज कुठे आणि कसा करावा लागतो ?

स्वाधार योजनेला अर्ज करण्यासाठी hmas.mahait.org या लिंक वर जाऊन आपला आयडी पासवर्ड तयार करून पुढे वैयक्तिक माहिती, जातीच्या दाखल्या बाबत माहिती उत्पन्नाबाबत माहिती, Parmanant आणि current address ची माहिती, मागील वर्षी शैक्षणिक डिटेल्स त्यामध्ये दहावी बारावी डिप्लोमा पदवी हे कधी कुठे कोणत्या वर्षी झाले याबाबतची माहिती, चालू अभ्यासक्रमाची माहिती, त्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करून ह्या योजनेला अर्ज करू शकता. अर्ज करण्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आणखी जाहीर करण्यात आलेली नाहीये.

4) अर्ज करताना कोणकोणती काळजी घ्यावी?

१) अर्ज करताना योजनेच्या सर्व नियम अटी विचारात घेऊन माहिती घेऊन अर्ज करावा.
२) अर्ज करताना अर्ज हा मोबाईल वर भरता लॅपटॉप वर भरावा किंवा अनुभवी इंटरनेट कॅफेवर भरावा.
३) अर्ज केल्यानंतर अर्जाचा स्टेटस आठवड्यातून किमान एकदा स्वाधार योजनेचा वेबसाईटवर बघावा.
४) कागदपत्र चुकीची अपलोड करू नये किंवा ब्लर स्वरूपात अपलोड करू नये.
५) अनावश्यक कागदपत्र जोडू नये.
६) शेवटच्या तारखेची वाट न बघता कागदपत्रांची तयारी लवकरात लवकर करून अर्ज करावा.
७) विद्यार्थ्यांनी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच स्वाधार मिळेल अशा ठिकाणी महाविद्यालयात ऍडमिशन घ्यावे.
८) शिक्षण घेताना एटी-केटी लागू नये कारण एकापेक्षा जास्त एटीकेटी ॲडजस्ट होत नाही विद्यार्थी अपात्र होतो.

5) आता जाणून घेऊ पात्र होण्यासाठी कोणकोणत्या नियम अटी आहेत?

१) विद्यार्थ्यांचा दोन वर्ष गॅप असेल तर चालेल. पण त्यापेक्षा जास्त चालणार नाही.
२) विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त पदवी करिता स्वाधारचा लाभ मिळणार नाही.
३) जे विद्यार्थी 11 वी 12 वी तसेच कोणत्याही पदवी किंवा मास्टर्सला शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थी या योजनेला अर्ज करू शकतात.
४)तसेच ज्यांनी या योजनेला फर्स्ट इयरला अर्ज केलेला नाही. परंतु आता ते सेकंड इयरला आहेत थर्ड इयरला आहेत फोर्थ इयरला आहेत असे विद्यार्थी सुद्धा या योजनेला आता अर्ज करू शकतात.
५) विद्यार्थ्याला ह्या योजनेचा लाभ घेताना अभ्यासक्रमात एटी-केटी लागली असेल तर एक वेळेस अड्जस्ट केल्या जाईल. म्हणजे मागील वर्षी विद्यार्थी फर्स्ट इयरला होता. स्वाधार योजनेचा लाभ घेतला होता. आणि सेकंड ईयरला एटीकेटी पडली. तर थर्ड इयरला ऍडजेस्ट होते. Atkt मार्कशीट जोडून थर्ड इयरला स्वाधारचा अर्ज भरून लाभ मिळवता येतो.
६) विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाख च्या आत असावे.
७) विद्यार्थ्याचे महाविद्यालय तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्यातील महानगरपालिकेची हद्द जिथे संपते तिथून पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये असावे.
७) अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याला मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त मार्क असावेत.
८) स्वाधार योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
९) परंतु विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. फेल झाला तर तिथून पुढे लाभ मिळणार नाही.
१०) विद्यार्थी शासकीय वस्तीगृहात राहणारा नसावा.
११) कुठेही नोकरी व्यवसाय करणारा नसावा.
१२) आई-वडिलांसोबत राहणारा नसावा.
१३) जिथे महाविद्यालय आहे तिथे मूळचा राहणारा नसावा.
१४) अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षाच्या आत असावे.
१५) विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाची उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असावी.
१६) वरील नियम अटी दुर्लक्ष करून खोट्या पद्धतीने या योजनेला अर्ज केला तर विद्यार्थ्याला 12% व्याजासहित मिळालेली रक्कम परत करावी लागेल.
अशा या सर्व नियम अटी होत्या. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्याव्या.

6) आता या स्वाधार योजनेला अर्ज करण्यासाठी पुढील आवश्यक कागदपत्र लागतील – 250kb pdf) –

१. अर्जदाराचा फोटो
२. अर्जदाराची सही
३. जातीचा दाखला
४. आधार कार्डाची प्रत
५. बँक पासबुक प्रत
६. तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७. महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
८. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा
९. शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC
१०. स्थानिक रहिवाशी नसल्याचे, शासकीय वसतिगृह प्रवेश नसल्याचे, आईवडीलां सोबत राहत नसल्याचे आणि कोणताही नोकरी/व्यवसाय करत नसल्याचे नोटरी प्रतिज्ञापत्र.
११. रहिवासी दाखला
१२. मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
१३. भाडे करारनामा/भाडे चिठ्ठी/खाजगी वसतिगृहाची पावती
१४. शैक्षणिक गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट. (गॅप दोन वर्षाच्या आत असावा)
ही सर्व कागदपत्रे लागतील.

7) आता जाणून घेऊयात अर्ज केल्यानंतर या योजनेचा लाभ कसा आणि किती दिवसात मिळेल?

अर्ज केल्यानंतर विद्यार्थी अर्जाची चलनी चार टप्प्यात होते विद्यार्थी पात्र असेल तर अर्ज एप्रिल होतो विद्यार्थी नियमांतर्गत नियम अटीत बसत नसेल तर विद्यार्थी रिजेक्ट होतो विद्यार्थ्यांचा अर्ज तपासण्यासाठी आहे तर अंडा स्कुटीने असा स्टेटस दिसतो किंवा विद्यार्थ्यांमध्ये काही अर्जात काही तुरळ त्रुटी असतील त्या विद्यार्थ्याला तो अर्ज सेंडबॅक पाठवला जातो त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्ण करून तो रिप्लाय करू शकतो म्हणजेच एडिट करू शकतो.
पात्र झाल्यानंतर विद्यार्थ्याला या योजनेचा दोन टप्प्यात लाभ दिला जातो. एक साधारणपणे दिवाळी अगोदर आणि एप्रिल महिन्या अगोदर शासन नियमानुसार मिळायला हवा. परंतु अर्ज प्रक्रियेची चालढकल पाहता याला साधारणता अधिकचा वेळ लागतोच परंतु लाभ नक्की मिळतो.

8) काही अडचण आली तर कुठे संपर्क करायचा ?

जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये स्वाधार विभागात संपर्क केल्यास आपल्याला माहिती मिळेल परंतु कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना नीट माहिती दिली जात नाही अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात त्यामुळे कारल्यास समाधानकारक माहिती मिळाली नाही तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीच्या पुढील समाज माध्यमांवर आपण जोडून राहू शकता व आपले प्रश्न समस्या मांडू शकता त्याचे समाधान प्रशासनाशी समन्वय साधून नक्की केल्या जाईल.
१) स्वाधार योजनेच्या अधिक माहितीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा असलेला स्वाधार योजना टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यासाठी आपण तुमच्या टेलिग्राम अँप वर swadhar scheme maharashtra हा group येतो तो तुम्ही जॉईन करू शकता.
२) विद्यार्थी हक्क समितीच्या जिल्हानिहाय व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
३) swadhar scheme Maharashtra या instagram पेज ला फॉलो करा.
४) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीच्या फेसबुक पेजला फॉलो करा.
५) अशा प्रकारच्या वेळोवेळी अपडेट देणारे या स्टुडंट्स स्कीम या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.
६) आणि विद्यार्थी हक्क समितीच्या studentscheme.in या वेबसाईटला सुद्धा आपण स्वाधार योजनेच्या अपडेट जाणून घेऊ शकता.
७) तसेच दुपारी दोन ते तीन या वेळेत समितीच्या पदाधिकाऱ्यांना आपण कॉल करू शकता. कॉल करण्यासाठी rajratna balkhande official या माझ्या instagram आयडीवर ला मेसेज करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *