महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अर्थ सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या म्हणजेच इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ यासारख्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तीगृहातला www.hmas.mahait.org अर्ज करण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
शासकीय वस्तीगृह अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाने विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध सोयी सुविधा मिळतात.
शासकीय वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांना अर्ज केल्यानंतर गुणवत्ता यादी प्रकाशित करून त्यानुसार विद्यार्थ्यांची वसतिगृहा साठी निवड केली जाते.
विद्यार्थ्याला शासकीय वस्तीगृहाचा लाभ मिळाला नाही तर विद्यार्थ्याला स्वाधार योजनाला अर्ज करता येईल त्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावरती राहण्याचा व जेवणाचा साठ हजार रुपये खर्च शासनामार्फत दिला जातो.
तसेच या शासकीय वस्तीगृहासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

