वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

VSPM Reg.No.: MH/59/96 (PARBHANI), F-2666 (PARBHANI) Est. 1996, द्वारा संचलित

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

बार्टी, महाज्योती, सारथी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण CET अर्जात काही चुका झाल्या असतील तर महत्वाची सूचना

बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प, योजना तसेच विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. सन २०२५-२६ करीता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठीची जाहिरात दि.१०/०८/२०२५ रोजी बार्टी संकेतस्थळावर तसेच विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी बार्टी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज दुसऱ्यांदा दिलेल्या मुदत वाढीनुसार दि. ३०/०८/२०२५ पर्यंत सादर करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या.

बार्टी च्या नव्याने आलेल्या घोषणापत्रकाद्वारे बार्टी, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांच्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी दि. ३१/०८/२०२५ या एक दिवसाच्या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जातील ठराविक बाबी दुरुस्त करण्यासाठी व अर्जाची प्रिंट काढण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन बार्टीने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *